भारतीय जनता पार्टीचा सातारा शहर च्या वतीने भ्रष्टाचारी सरकार विरुद्ध निषेध
सातारा प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज
भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराध्यक्ष श्री विकास गोसावी आणि तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा शहरात पोवई नाका येथे महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या,महिलांवरील वाढते अत्याचार, एमपीएससी परीक्षेचे ढिसाळ नियोजन आणि मनसुख हिरेन आत्महत्याप्रकरणी हे सत्य बाहेर आले आहे त्यामध्ये पोलीस माजी पोलीस महासंचालक यांनी गृहमंत्र्यांवर जे आरोप केलेत त्याचा सारासार विचार करून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पदाचे राजीनामे द्यावेत अशी भांडी भारतीय जनता पार्टी सातारा च्या वतीने करण्यात आली
यावेळी अब तो ये स्पष्ट है, ये सरकार भ्रष्ट है , महाविकास आघाडी चा धिक्कार असो, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे ,मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा द्या ,या प्रकारच्या घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, औद्योगिक आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल सणस ,सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले,,जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे,जिल्हा चिटणीस सुनील जाधव ,शहर उपाध्यक्ष चंदन घोडके ,प्रशांत जोशी ,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषाताई पांडे,, शहर चिटणीस रवी आपटे , युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम बोराटे ,महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष मोनाली पवार, सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनिता शहा,
अनुसूचित जाति मोर्चा शहराध्यक्ष संदीप वायदंडे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम पवार ,व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे, आरोग्य सेवा जिल्हाध्यक्ष विवेक कदम, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अली आगा, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गीता लोखंडे, उपाध्यक्ष वनिता पवार, सातारा शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष कुंजा खंदारे, ओद्योगिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंगसाळे, नगरसेवक सुनील काळेकर, अमोल कांबळे अनुसूचित जाति मोर्चा सातारा शहर सरचिटणीस विक्रम अवघडे, ओबीसी मोर्चा युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनीष महाडवाले ,महिला मोर्चा सातारा शहर सरचिटणीस हेमांगी जोशी, ओबीसी मोर्चा महिला सरचिटणीस सुरेखा धोत्रे, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष जयश्री निकम, कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस जगन्नाथ गावडे, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी श्रीकांत शिंदे, कामगार आघाडी जावली तालुका अध्यक्ष प्रमोद साळुंखे ,सातारा तालुका कामगार आघाडी अध्यक्ष आनंदा घोरपडे युती मोर्चा अध्यक्ष कु दीपिका झाड , औद्योगिक जिल्हा सरचिटणीस दीपक क्षीरसागर आघाडी सर्व आघाड्या मोर्च्या चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.