नवारस्ता प्रतिनिधी :- मुळगाव मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुळगाव मधील बौद्ध वस्ती व मातंग वस्ती यांनी एकत्रितपणे मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.
कोरोना मुळे गेली दोन ते अडीच वर्षे सर्वच सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले होते त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नव्हती परंतु प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याने भीमसैनिकाच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मुळगाव मध्ये जयंतीच्या सुरुवातीला सामुदायिकरित्या गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, म. फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांची वाजत गाजत मुळगाव गावामधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपन्न झाल्यावर जयंती समारोप कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये मुळगाव मधील शालेय विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली यामध्ये कु. प्रज्ञा गायकवाड, कु.सेजल दंडवते, कु. दीक्षा गायकवाड व कु. मृणाल गायकवाड या विद्यार्थ्यांनींनी प्रभावीपणे मनोगते सादर केली.सदर जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नथुराम गायकवाड, दीपक गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य जगदीश गायकवाड, रतन चव्हाण, चंद्रकांत गायकवाड, अमित गायकवाड, गणेश चव्हाण, सौरभ गायकवाड, सतीश गायकवाड, पोपट गायकवाड, बाबासो भिसे, विकास गायकवाड, प्रसाद गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.