सातारा – गुजरात, अहमदाबाद येथे झालेल्या वेस्ट झोनल बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा खेळाडू पृथ्वीराज शिंदे याने सुवर्णपदक पटकावले.
अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या वेस्ट झोनल बॉक्सिंग चंपियनशिप स्पर्धेमध्ये पृथ्वीराज शिंदे याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना गोवा राज्याच्या खेळाडूविरुद्धच्या अंतिम सामन्यात चमकदार खेळाचे प्रदर्शन करून विजय मिळवला आणि सुवर्णपदक पटकावले. त्याला आंतरराष्ट्रीय मानद बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप आणि विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, विभागीय सचिव योगेश मुंदडा, सातारा बॉक्सिंग ॲकॅडमीचे पदाधिकारी हरीश शेट्टी, जगन्नाथ जगताप, रवींद्र होले, अमर मोकाशी, संजय पवार, बापूसाहेब पोतेकर, तेजस यादव, मधुर भोसले, ओमकार गाढवे, डॉ. राहुल चव्हाण, ॲड. साईप्रसाद होले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.