महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून दोन गुन्हेगारी डोळ्यातील 14 जणांना तडीपार करण्यात आले आहे तर यासह गेल्या दोन वर्षात कराड शहर पोलीसांकडून 47 जणांना तडीपार करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्या आदेशाने कराड पोलिसांनी रेकॉर्डवरील व गुन्हेगारी संबंधित टोळ्यातील अनेकांवर नजर ठेवली होती. कराड शहर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी टोळ्यातील अनेकांवर लक्ष ठेवत वेळोवेळी त्यांना सूचना करत समज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी या टोळक्याच्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळल्या असून शहरातील सुमारे 47 जणांना गेल्या दोन वर्षात शहरातून तडीपार करून शहर व परिसरातील शांतता अबाधित राखण्याचे काम केले आहे.
बजरंग उर्फ बज्या सुरेश माने (वय 26 वर्ष), पवन सुनील भोसले (वय 21 वर्ष), योगेश दादा भोसले (वय 20 वर्ष), प्रतिक विजय साठे (वय 28 वर्ष), शुभम सुनील जाधव (वय 22 वर्ष) गणेश संजय वायदंडे (वय 21 वर्ष) सर्व राहणार बुधवार पेठ कराड. विशाल उर्फ चिंग्या श्रीकांत घोडके (वय 29 वर्षे) रा. रैनाक गल्ली शनिवार पेठ कराड, आकाश उर्फ सोन्या निलेश रावखंडे (वय 27 वर्ष), रा.चांभार गल्ली गुरुवार पेठ कराड, आदित्य मदन घाडगे (वय 24 वर्ष), संकेश राजेश डांगे (वय 23 वर्षे) दोन्ही रा. शुक्रवार पेठ कराड, सत्यजित गोरख सूर्यवंशी (वय 23 वर्ष) रा. शिक्षक कॉलनी, शिवाजी स्टेडियम जवळ शनिवार पेठ कराड ,या टोळीस संपूर्ण सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा,वाळवा व कडेगाव तालुक्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
टोळी नंबर दोन मधील कूंदन जालिंधर कराडकर (बय 25) रा.गजानन हौ.सोसायटी, अर्जून यशवंत कूंभार (वय 32) रा.शनिवार पेठ,कराड, अभिजीत संजय पाटोळे (वय22) रा.शिवाजी स्टेडिअम कराड,,या टोळीस संपूर्ण सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा,वाळवा व कडेगाव तालुक्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा गून्हेगारी अभिलेख व त्यांच्या गुप्त हालचालीवर लक्ष ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारी टोळ्यांचे मुळावर कायदेशीर घाव घालने ही हद्दपारीची कारवाई वैशिष्ट्य मानावे लागतील. अशा कारवाई मधून गुन्हेगारामुळे समाजामध्ये निर्माण झालेली असुरक्षितता बदलून कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकासाठी सुरक्षित व शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा मानस यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहेत.
ही हद्दपारीची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस नि.बी आर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, स.पो. अमित बाबर, सहा.फौ. सतिश जाधव, संतोष सपाटे, पो. हवालदार नितीन येळवे, जयसिंग राजगे, पो.ना. संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, संग्राम पाटील, सुजित दाभाडे यांनी ही कारवाई केली आहे.नमूद हद्दपार गुन्हेगार हे आपल्या परिसरात मिळून येताच कराड शहर पोलीस ठाण्यात अवगत करावे. जो इसम सदर बाबत कराड शहर पोलिसांना माहिती देईल त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही कराड शहर पोलीस ठाण्याकडून आव्हान करण्यात आले आहे.






















