जंक्शन ता. इंदापूर परिसरात मध्य रात्री १ वाजता वीजेचा कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाले होते. जंक्शन वालचंदनगर रणगांव शिरसटवाडी या भागात जवळजवळ ४ तास संततधार पाऊस पडल्याने खरीपाच्या पेरणीला वेग येणार आहे. जून महिन्यात सर्वात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेले पहावयास मिळत आहे. जून महिन्यातील या परिसरात हा तीसर्यांदा चांगला पाऊस झाला आहे.
जंक्शन ता. इंदापूर या पश्चिमेकडील भागात गुरूवारी रात्री १ वाजता अचानक मेघ गर्जना विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाले. वार्याचा वेग असल्याने जोरदार पावसाला सुरूवात झाले होते. रस्त्यावर पाणी वाहीले. घरासमोर तळ्याचे स्वरूप निर्माण झाले होते. या भागातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असताना मध्यरात्री जोरदार पाऊस पडल्याने खरीपाचे पेरणी करण्याची जोरदार तयारी शेतकऱ्याने केले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाले असून चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळत आहे. अजून जोरदार पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.