मेंटर टीचर अंजली खाडे व रामभाऊ खाडे यांनी केली नाटिका सादर
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / बिदाल : आकाश दडस
सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व मोहीम घराघरात पोहोचण्यासाखी जिल्ह्यातील सर्व केंद्रातील मेंटर टिचर यांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन ही जनजागृती मोहीम यशस्वी करण्याचे ठरवले आहे.
माण तालुक्यातील ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनीही तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांची ऑनलाईन ,फेसबुक लाईव्ह माध्यमातून मिटिंग घेऊन मार्गदर्शन केले.
माण तालुक्यातील मेंटर टीचर अंजली खाडे व रामभाऊ खाडे यांनी हे प्रशिक्षण पिंपरी व गोंदवले केंद्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळेतील शिक्षकांना कोरोना जनजागृती मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रभावी नाटीका व संवादातून दिले.
जाशी आणि पळशी गावातील सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती ,पालक, विद्यार्थी अंगणवाडी सेविका व आशा यांच्यापर्यंत जनजागृती मोहीम संवाद व नाटीकेच्या स्वरुपात पोहोचवली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मेंटर टीचर बाबा खाडे यांचे साहाय्य लाभत आहे.शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख आवळे साहेब, पवार साहेब, गंबरे, शिंदे यांचेही मार्गदर्शन यांनी मार्गदर्शन केले