फलटण प्रतिनिधी :- फलटण महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपविभागात नवीन वीज मीटर जोडणी व नादुरुस्त वीज मीटर जोडणी चे पैसे भरूनही मीटर करिता ग्राहकांना कृत्रिम मीटर टंचाईला सामोरे जावे लागत आहे तसेच महावितरण बारामती व सातारा कार्यालयात याबाबत तक्रारी दाखल होऊनही वरिष्ठ अधिकारी याबाबत कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत.
गेली अनेक महिन्यापासून विज मीटर शिल्लक नसलेमुळे विज कनेक्शन जोडण्यात व नादुरुस्त मीटर चे पैसे भरलेल्या मीटर जोडणीत विलंब होत असल्यामुळे तसेच प्रलंबित यादीनुसार विज जोडणी दिली जात नसलेमुळे फलटण विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद, खंडाळा या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील वीज ग्राहक पुरते वैतागले असून महावितरण अधिकारी यांच्याकडून कुत्रीम विज मिटरची टंचाई होत असल्याचा आरोप वीज ग्राहक करत आहेत.
नवीन वीज जोडणीसाठी व नादुरुस्त मीटर चे पैसे भरलेल्या ग्राहकांना विज मीटर नसल्यामुळे विज जोडणीपासून वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना अधिकारांची माहिती नसणे याचाच फायदा महावितरण अधिकारी उचलत आहेत . एकीकडे नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला पण त्यांची अंमलबजावणी महावितरणच्या फलटण विभागीय कार्यालयाकडून होताना दिसत नाही.
अनेक महिन्यापासून विज मीटरची वाट पाहणाऱ्या अनेक नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारूनही एकच उत्तर मिळत आहे की “मीटर शिल्लक नाहीत , मिटर आल्यावर विज जोडणी व नादुरुस्त मीटर दिले जाईल” असे उत्तर दिले जात आहे परंतु दुसरीकडे निवडक मर्जीतील ठेकेदार तसेच इच्छापूर्ती करणाऱ्या ग्राहकांना तत्काळ विज मीटर मिळत आहेत.
महावितरण बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता पावडे , सातारा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गायकवाड , महावितरण विभागीय कार्यालय फलटण कार्यकारी अभियंता आवळेकर , या अधिकारी वर्गाची भूमिका काय आहे हे कळत नाही. सर्व उपविभागातील शाखा कार्यालयात महावितरणचे नियम डावलून विज जोडणी दिल्याची बाब समोर येत आहे. नियमबाह्य विज मिटर जोडणी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी प्रलंबित विज जोडणी व नादुरुस्त मीटर ग्राहकामधून होत आहे.
महावितरण फलटण विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मर्जीने अनेक शाखा अभियंते आर्थिक भ्रष्टाचार करत विज जोडणी व नादुरुस्त मीटर पैसे भरलेल्या प्रलंबित ग्राहकांच्या यादी प्रमाणे विज जोडणी व मीटर जोडणी न देता स्वतःच्या मर्जीने मनमानीपणे देत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्याची तसेच जबाबदार अधिकारी यांचेवर कडक कारवाईची करण्याची मागणी प्रलंबित वीज ग्राहकांकडून होत आहे.
सदर या नियमबाह्य कामात विभागीय कार्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी यांची कोणत्या लाभापोटी मूक संमती आहे यांचा बोध होत नाही. महावितरणने मागील अनेक महिन्यातील एकूण प्रलंबित यादी व त्यांपैकी दिली गेलेली वीज जोडणी यांची यादी संपूर्ण तपशीलवार जाहीर करावी. नियमबाह्य विज जोडणीबाबत जबाबदार महावितरण अधिकाऱ्यावरती अनेक ग्राहकांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या असून सोबत वरिष्ठ अधिकारी हे तक्रारीबाबत दुर्लक्ष करत असल्याचे पुरावे जोडून पाठवत असल्याने आता ऊर्जामंत्री नितीन राऊत काय कारवाई करणार ? थकीत वीज बिल वसुलीसाठी कडक भूमिका घेणारे ऊर्जामंत्री या प्रकरणात कडक भूमिका घेणार की काय यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.