लोणंद प्रतिनिधी
दिनांक २९ रोजी पालखी सोहळा काळात रोटरी क्लब लोणंद आणि इनरव्हील यांच्याकडून बिस्किट पुड्यांचे तसेच चिवडा पाकीटांचे वाटप, तसेच ॲक्युप्रेशर पाॅईंटस दाबने, पायाच्या तळव्यांची मालिश करने, वारकऱ्यांचे केस- दाढी करने अशा कामाबरोबरच वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध वाटपही करण्यात आले. यासाठी न्यू प्लस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई येथील डॉक्टर्स ची टीम उपस्थित होती. तसेच यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणंद आणि इनरव्हील क्लब ऑफ लोणंद यांच्या आयोजनाने झालेल्या मदत केंद्राचे उद्घाटन लोणंद चे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील यांच्या सह रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर निकम, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. किशोर बुटीयानी आणि इनरव्हील अध्यक्षा मुनिरा लोणंदवाला यांच्या हस्ते झाले.

यावेळी शिल्पा शाह ,शिल्पा पवार , शेख बिल्कीस , दर्शना रावळ , उमा राव , शानू चंद , मुनिरा लोणंदवाला , मीना वायकर ,चैत्राली सुर्यवंशी व रोटरी सेक्रेटरी चव्हाण, डॉ. देशमुख डॉ. अनिल राजे निंबाळकर, प्रवीण चांदवडकर, अहमद लोणंदवाला, मुस्तफा लोणंदवाला, डॉ.गणेश दानी, खंडारे सर, प्राजीत परदेशी, कराड च्या माजी प्रेसिडेंट छाया पवार हे सदस्य उपस्थित होते






















