महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (फलटण)
दिनांक. २१. रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक दिवसीय दूध बंद आंदोलनाची हाक संपूर्ण राज्य मध्ये दिली होते याच अनुषंगाने फलटण तालुक्यातील राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणमध्ये मानकेश्वर मंदिरात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक करून या आंदोलनाचे सुरुवात करण्यात आली यानंतर फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दूध दरवाढीच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले
या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की आज दूध व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेला असताना ३० ते ३२ रुपये दर असलेला दुधाचा दर आज १८ ते २० इतका खाली आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबरच यावर अवलंबून असलेल्या पशुधन हे संकटात सापडले आहे त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान द्यावे व दुधाला प्रति लिटर वाढीव दर देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे

यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव ,फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर ,फलटण तालुका युवा आघाडी अध्यक्ष प्रमोद गाडे बाळासाहेब शिपकुले, शिवाजी सोडमिसे, प्रल्हाद अहिवळे उपस्थित होते.
साखरवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक करून आंदोलनकरण्यात आले तसेच साखरवाडी मध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात महादेवाच्या मंदिरात दुधाचा अभिषेक करून करण्यात आली यावेळी संघटनेचे पदाधिकारी दादा जाधव , रविकिरण भोसले, सुभाष जाधव व अमोल मोरे हे कार्यकर्ते उपस्थित होते
सोमंथळी येथे हनुमान मंदिरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुधाचा अभिषेक करून आंदोलनसोमंथळी गावामध्ये स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडून सकाळी हनुमानाच्या मंदिरामध्ये मूर्तीला दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, शिवाजी सोडमिसे उपस्थित होते.















" width="90" height="60">
" width="180" height="120">




