दै.महाराष्ट्र न्यूज
गोंदवले:- अवघ्या राज्यातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झालेले असतानाच तमाम महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या मान तालुक्यातील गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची पालखी देखील आज सकाळी साडेआठ वाजता गोंदवल्याहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली
‘श्रीराम जय राम जय जय राम,ग्यानबा तुकाराम’च्या गजरात ही पालखी पंढरीच्या दिशेने मोठ्या उत्साहात रावांना झाली. सकाळी महाराजांचे धुपारती पार पडल्यानंतर उपस्थित वारकरी टाळकरी आणि माळकरी यांनी मोठ्या उत्साहात गोंदवलेकर महाराजांची ही दिंडी सोबत घेत पुंडलिका वरदा’च्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान केले.हरिनामाचा गजर करत ही पालखी म्हसवडमार्गे पिलीवच्या घाटातून पुढं जात पंढरीच्या दिशेने पुढं सरकेल.
गोंदवलेकर महाराजांचा महिमा सर्व भाविकांना माहीत आहेच शिवाय ते त्यांच्या कार्यक्षेत्त्रामुळे समस्त महाराष्ट्रवासीय लोकांचे श्रद्धास्थान आहेत.मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास गोंदवलेकर महाराजांच्या पादुका धुवून त्या रथात ठेवल्या गेल्या,त्यावेळी गावकऱ्यांसह वारकऱ्यांनी हरिनामाचा एकच जयघोष केला.यावेळी वारकरी,गावचे प्रथम नागरिक,सर्व सदस्य आणि ग्रामस्थ व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.