मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे. राऊत 4 ऑगस्टपर्यंत कोठडीत असतील.
सक्तवसुली संचालनालयाने रविवारी मनी लॉंड्रिंग प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी केली होती.
राऊत यांच्या विरुद्ध ईडीने जारी केलेल्या दोन समन्सवेळी ते हजर राहीले नाहीत, या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 9 तास चौकशी केल्यानंतर राऊत यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, राऊत यांना चार दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे.
ईडी चौकशी दरम्यान राऊत यांनी काल प्रतिक्रिया दिली होती. जी कारवाई व्हायची ती होऊ द्या. मी घाबरत नाही. राजकीय सूडापोटी हा खेळ सुरू असला तरी पक्ष माझ्या पाठीशी आहे. उध्दव ठाकरे, शिवसैनिक यांचे मला पाठबळ आहे. शिवसेनेमुळेच देशात आणि राज्यात माझी ओळख आहे. मात्र मी गुडघे टेकत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. या कारवाईलाही न घाबरता सामोरे जाईल व यातून महाराष्ट्रालाच बळ मिळेल. ईडी कारवाई नंतर संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.






















