10 दिवसापूर्वी दिलेल्या स्थगिती आदेश जुगारून पालिकेच्या नाकावर टिचून बांधकाम
फलटण :
फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी फलटणमधील प्रख्यात बांधकाम व्यवसायिकाला त्यांनी केलेल्या चुकीच्या बांधकामाविरोधात सजग नागरिकांनी केलेल्या तक्रारी अर्जावरून सुमारे दहा दिवसांपूर्वी तक्रारी अर्ज निकाली निघत नाही तोपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याबाबत नोटीस देऊन सुद्धा सदर व्यवसायिकाने नगरपालिकेच्या नाकावर टिचून मुख्याधिकाऱ्यांच्या नोटीस आदेशाला केराची टोपली दाखवीत बिंदिक्कत बांधकाम सुरू ठेवल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
फलटण शहरातील लक्ष्मी नगर येथील न भू क्रमांक ६४७२ प्लॉट नंबर २ भूमीअभिलेख प्रशासकीय इमारतीच्या शेजारी राम प्राईड बिल्डिंग चे बांधकाम चालू आहे. सदर बांधकाम व्यावसायिकाने नगरपालिकेचे नवीन डीसीआर रूल चे उल्लंघन करून रस्ता व बिल्डिंग चे सामासिक अंतर नियमाचा भंग करून सेट बॅक मध्ये ज्यादा बांधकाम केलेले असल्याने काही सजग नागरिकांनी या विरोधात नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे या बांधकाम विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता त्यास अनुसरून दि 27 रोजी पालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड यांनी बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत व तसे न केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नोटिसी मध्ये म्हटले आहे मात्र तरीसुद्धा मुजोर बांधकाम व्यावसायिकाने सदर ठिकाणीचे बांधकाम सुरूच ठेवल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.




















