*उच्च न्यायालयाने अटक पुर्व जामीन फेटाळले नंतर उंब्रज पोलीस टिमची कारवाई*
माहिती अधिकाराचा वापर करून खंडणी मागणाऱ्या खंडणी बहाद्दर महेश उर्फ बंडा काशीदला अटक करण्यात आली असून याबाबतची सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे –
उंब्रज येथील रहिवासी व माहिती अधिकार कार्यकर्ता महेश काशीद याचेवर उंब्रज पोलीस स्टेशन ला गेल्या महिन्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाले नंतर संशयित हृदयाचे आजाराचे कारण सांगून सातारा हाॅस्पीटल सातारा या खाजगी हाॅस्पीटल मध्ये ॲडमीट झाला होता , हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याच दरम्यान त्याने आजाराचे कारण देत मा.सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता.
सदर संशयित महेश काशीद याचे विरूद्ध सन 2020 मध्ये ही उंब्रज पोलीस स्टेशन ला माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून त्रास दिल्याबद्दल ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेही संशयित हृदयाच्या आजाराचे कारण देत कराड येथील मा.सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्यात यशस्वी झाला होता. तोच कित्ता गिरवत सदर संशयित यावेळीही माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून खंडणी मागण्याच्या गुन्हा दाखल प्रकरणी ॲडमीट होऊन जामीन घेणे साठी प्रयत्न चालु केला होता , परंतु सपोनि अजय गोरड यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व उंब्रज पोलीस टिमने त्याच्या बेकायदेशीर कृत्याबाबत सबळ पुरावे मा.सत्र न्यायालयात सादर केल्याने मा.सत्र न्यायालय कराड यांनी आरोपीचा जमीन अर्ज दि.13/3/2023 रोजी फेटाळला होता.
संशयित महेश काशीद हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्या नंतर सातारा येथील हाॅस्पीटल मधुन पुणे येथे खाजगी हाॅस्पीटल मध्ये ॲडमिट झाला होता व मा.हायकोर्ट यांचेकडे अटक पुर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
सदर जामीनावर मा. हायकोर्ट मध्ये सुमारे एक तास सुनावणी झाली.सुनावणी मध्ये उंब्रज पोलीस टिमने आरोपी माहिती अधिकाराचा गैरवापर करून कशाप्रकारे खंडणी गोळा करत आहे त्याचे पुरावे व अटकेपासून वाचण्यासाठी हाॅस्पीटल चा कसा वापर करत आहे ही बाब भक्कमपणे सरकारी वकीलां मार्फत मांडलेनंतर मा.हायकोर्ट न्यायालयाने संशयित महेश काशीद चा अटक पुर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
महेश काशीद याला खाजगी डाॅक्टरांनी बेड रेस्ट ची दिलेली मुदत संपलेनंतर आज रोजी उंब्रज पोलीस स्टेशन टिमने संशयित महेश काशीद याला अटक केले.अटक नंतर मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कराड यांचे समक्ष हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अजय गोरड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व उंब्रज पोलीस टिम करत आहे.
तसेच माहिती अधिकाराचा वापर करून खंडणी गोळा करणाऱ्यां विरूध्द तक्रार देण्याचे आवाहन उंब्रज व परिसरातील नागरिकांना , उंब्रज पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.






















