वाई : वाई येथील शिवसेनाभवन येथे दरवर्षी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली बाळासाहे ठाकरे यांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे.
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वाईमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम राबवले जातात यामध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो. वाई शिवसेनेच्या वतीने हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना वाई तालुका प्रमुख अनिल शेंडे, ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम बडे, तुळशीदास पिसाळ, वाई शहर प्रमुख गणेश जाधव, किरण खामकर, योगेश चंद्रस, नितीन पानसे, सोमनाथ अवसरे, गौतम यादव, स्वप्निल भिलारे, गणेश किर्दत, पंकज शिंदे, किशोर प्रभाळे, प्रतिभाताई हगवणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




























