साताऱ्याचे जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची अचानक शासनाने बदली केली आहे. महाबळेश्वर पाचगणी कास, मॅप्रो गार्डन बाबत घेतलेली कडक भूमिका, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आजच जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती आणि आजच त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत.
सातारकरांच्या प्रत्येक प्रश्नासाठी वेळ देणारा जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द नक्कीच लक्षात राहिल.