संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा पालखी सोहळा दिनांक १/७/२०२२ते२/७/२०२२ या दोन दिवस फलटण मुक्कामी आहे . पालखी तळ हा दरवर्षी प्रमाणे विमान तळ येथे घेण्यात आला आहे .मागील दोन वर्षापासून करोना महामारी सारखे संकट अख्या जागावरती होते त्यामुळे माऊलींच्या पायी वारीला दोन वर्ष खंड पडला होता . या दोन वर्षांनंतर प्रथमच माउलींची पालखी फलटण मध्ये येत आहे .या पालखी सोहळ्याचे नियोजन फलटण नगर परिषद करीत आहे . तसेच आज समशेर सिंह नाईक निंबाळकर विरोधी पक्षनेते फलटण नगर परिषद फलटण यांनी आज स्वतः फलटण पालखी तळावर येवून संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा आढावा घेतला , यामध्ये त्यांनी प्रामुख्याने पाण्याची सोय,लाईटची सोय,स्वच्छता, शौचालये या सर्व गोष्टींची पाहणी केली व नगर पालिका प्रशासन व कर्मचारी यांना संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या सोहळ्यामध्ये येणाऱ्या वारकरी आणि भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध सुविधांची पाहणी केली .यामध्ये असलेल्या त्रुटींबाबत प्रशासन व कर्मचारी फलटण नगरपरिषद फलटण यांना सूचना केल्या तसेच सदरील उर्वरित कामे त्वरित करण्यास सांगितले.यावेळी विरोधीपक्ष नेते समशेर सिंह नाईक-निंबाळकर यांच्या समवेत उपस्थित नगरपालिका कर्माचारी व सोबत निलेश चिंचकर, नितीन वाघ,सागर लंबाते, मिलिंद भोसले,जयवंत शिंदे आदी पालखी तळ पाहणी वेळी उपस्थित होते.