सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेल्या मराठी सिनेमाला मोहिते यांच्या वंशजांकडून आक्षेप.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.पण नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर वरती मोहिते यांच्या वंशजांकडून आक्षेप घेण्यात आला आहे
“सरसेनापती हंबीरराव सिनेमाची निर्मिती व दिग्दर्शन केल्याबद्दल सिनेमा बनवणाऱ्या आपण निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन..सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्यकर्तृत्व अनुकरणीय असेच आहे, त्यामुळे त्यांच्या वरील चित्रपट निर्मित करताना मोठी जबाबदारी आहे ..
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावचे ग्रामस्थ तसेच त्यांचे थेट वंशज त्यांचा इतिहास, सिनेमाची स्क्रिप्ट अथवा सरसेनापती हंबीररावांचे व्यक्तिमत्व कसे सादर करायचे याची कुठलीही चर्चा त्यांच्या वंशजांसोबत केलेली नाही.
त्यामुळे अधिकृतपणे जो ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावर प्रतिक्रिया वाद होण अपेक्षित आहे
हा ऐतिहासिक सिनेमा आणि त्यातील मुख्य व्यक्तिरेखा कुठल्या इतिहासकारांना विचारून, कोणत्या कागदपत्रांच्या अथवा पुस्तकांच्या आधारावर काढला आहे हे जाणण्याची उत्सुकता सर्वाना आहे सिनेमाचे टीजर आणि ट्रेलर बघितल्यानंतर निर्माण झाली आहे. पण या सिनेमाबद्दल चे अक्षेप काय आहेत ते पाहू
सरसेनापतींचे व्यक्तिमत्व आम्हाला प्रथम दर्शनी असे सांगावेसे वाटते की सरसेनापती हंबीरराव यांचे व्यक्तिमत्व न समजलेला सिनेमा आहे असा भास होतो. त्याचे कारण, ट्रेलर बघितला तर त्या मध्ये जोरदार डायलॉग, आरडाओरड, कापाकापी, रक्त याच्या व्यतिरिक्त काही नाही. एक बलदंड शरीर यष्टीचा स्वराज्यरक्षक पायदळातील मावळा” याच्या पलीकडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार झालेला दिसत नाही. ट्रेलर मध्ये त्यांचे सुमार व्यक्तिमत्व, सामान्य शिपायासारखा पोशाख, पसरलेली केशरचना याचा कुठेही त्यांच्या व्यक्तिमत्वाशी दुरान्वयेही मेळ नाही असेच दिसून येते.
आर्थिक पाठबळ, सिनेमातील तकनीकी इफेक्ट याच्या जोरावर आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची larger than life व्यक्तिमत्व उभे करणार आहात असे सांगितले जाते. आर्थिक पाठबळ, टेक्निकल इफेक्ट्स, डायला॰ग, सोशल मिडिया आणि जाहिरातींचा भडिमार याच्या जोरावर तुम्ही व्यावसायिक यश मिळवाल. पण ट्रेलर बघितल्यानंतर असे वाटते की सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे चुकीचे व्यक्तिमत्व दाखवून कधीही भरून न निघणारे नुकसान होणार आहे.
याच्या उलट सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एका प्राचीन राजघराण्यातील अतिशय उद्या व्यक्तिमत्त्वाचे थोर पुरुष होऊन गेले. अष्टप्रधान मंडळामध्ये ते असे एकमेव प्रधान होते की जे स्वतः “राजे” होते. पूर्वीचे राजे राजासारखे दिसायचे, वागायचे, बोलायचे आणि कर्तुत्ववान पण होते.

छत्रपतींच्या घराण्याशी त्यांचे पिढीजात संबंध आणि सोयरिकी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे संबंधी आणि सुसंस्कृत व्यक्ती या सरसेनापती हंबीरराव यांच्या प्रतिमेला सुद्धा तडा जाईल की काय ही खंत आम्हाला आहे.
मुळगाव तळबीड आणि तेथील समाधीचा उल्लेख सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे थेट वंशज आजही अस्तित्वात आहेत. हिंदवी स्वराज्याबरोबरच भारतीय सैन्यामध्ये आणि इतर क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि व्यक्तिमत्त्वाने ठसा उमटवला आहे. हे तळबीडचे मोहिते घराणे फार कमी राजघराण्यांपैकी आहे की ज्या घराण्यात आज पर्यंत एकही दत्तक नाही. हे एक प्रसिद्धी विन्मुख घराणे असल्याचा गैरफायदा बरेच लोक आज काल घेताना दिसत आहे.
तळबीड हे सरसेनापती हंबीरराव यांचे मूळगाव तेथेच त्यांची अग्नी-समाधी मोहिते कुटुंबीयांच्या स्वतःच्या जमिनीमध्ये ३०० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे ( तसेच ती सरकार मान्य आहे) अशा पवित्र ठिकाणचा उल्लेख आणि दखल सिनेमांमध्ये कुठल्या भागांमध्ये घेतली गेली आहे, तो सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी आम्हाला दाखवावा अशी आम्ही आग्रहाची मागणी करत आहे.
तळबीड येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव: “हंबीरराव” हा घराण्यातील किताब असल्यामुळे त्याकाळात अजून एक हंबीरराव मोहिते अस्तित्वात होते, त्यामुळे “सरसेनापती हंबीरराव” हा सिनेमा जर का तळबीडच्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर काढला असेल तर तसा “तळबीडचा” स्पष्ट उल्लेख सिनेमामध्ये आलेलाच असेल याची आम्हाला कृपया खात्री करून द्यावी. अन्यथा इतिहासाची मोडतोड केल्याचा ठपका तुमच्यावर बसेल.
सरसेनापतींच्या इतिहास आणि व्यक्तिमत्वाबद्दल चुकीचा प्रचार-प्रसार, सादरीकरण या सिनेमाच्या अनुषंगाने होत असेल तर त्यावर आमचा आक्षेप आहे आणि यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर आम्हाला नाईलाजाने कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांचे म्हणणे आहे
संपूर्ण सिनेमा मध्ये त्यांनी बजावलेल्या महत्वाच्या कामगिरी बरोबरच त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे मूळ गाव योग्यरीतीने समाजासमोर सादर केले जावे अशी अपेक्षा ते करत आहेत
वरील आक्षेपांचे व समस्यांचे निराकरण न झाल्यास त्याला कायदेशीर मार्गाने जाऊ असा इशारा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी कराड येथील पत्रकार परिषद मध्ये दिला.






















