जिल्हा प्रशासनापासून राज्य प्रशासनापर्यंत मागासवर्गीय कर्मचारी व सामाजिक संघटना यांच्यावर आकस बुद्धीने व विशेषता ब्लॅकमेलिंगचा आरोप करत फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा जणू काही बीमोड करण्याचा चंग बांधून लपाछपी खेळणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनावर तिरडी आंदोलनाचा जबर झटका बसला व खऱ्या अर्थाने मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांवर होत असणारा अन्याय अत्याचार अधिकाऱ्यांच्या बागलबच्चांकडून दिशाभूल करणारी माहिती या सर्वांचा दस्तुरखुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ज्ञानेश्वर खिलारी यांचे सोबत चर्चेदरम्यान दूध का दूध पाणी का पाणी या उक्तीप्रमाणे पोल खोल झाली व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची झालेली दिशाभूल त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे संघटनेचे कार्य व संघटनेची ताकद काय आहे हे प्रशासनाला दिसून आले , यावेळी जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरील प्रश्नाचा निपटारा करण्याचा तसेच राज्यस्तरीय प्रश्नाबाबत प्रस्ताव प्रस्तावित करण्याबाबतचा शब्द ज्ञानेश्वर खिलारी यांनी या बैठकीत दिला. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी जि प प्रशासनाकडून , मुदत पुर्व बदली मधील अनियमितते बाबतीतील प्रकरण समोर आणली असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले की उपआयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले . मागासवर्गीयांच्या बोगस चौकश्या , पदोन्नती मध्ये मागासवर्गीयांवर कशा पद्धतीने अन्याय केला हे निदर्शनास आणले . आरोग्य विभागातील वैद्यकिय बिलाचे टेबल एकाच कर्मच्यार्याकडे का दिले जाते यावर CEO तात्काळ निर्णय घेण्याबाबत सहमत झाले . पदोन्नतीस पात्र असणाऱ्या कर्मच्यांऱ्यांना बदली प्रक्रियेत सामावून घेतलेले नव्हते मात्र श्री शितोळे नामक कर्मचारी यास अपवाद का ? श्री शितोळे हे पदोन्नतीस पात्र असताना कोरेगांव येथे बदली दाखवली जाते आणि १० दिवसात पुन्हा त्या कर्मचाऱ्यास जिल्हा मुख्यालयातच पदोन्नती का दिली जाते म्हणजे जि प प्रशासन जाणीव पुर्वक पक्षपाती पणा करतेय असा संघटनेचा स्पष्ट आरोप आहे त्यावर CEO म्हटले सदर प्रकरणाची माहिती घेतो . मागासवर्गीय संघटनाना तिमाही बैठकांची कारवाई तात्काळ करतो असा शब्द दिला . वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कर्मचारी या बाबत विषय निघाला त्यावर सीईओ यांनी बऱ्याच कर्मच्याऱ्याच्या बदल्या करताना ५- ७ वर्ष झालेल्यांची बदली केली असे स्पष्ट केले त्यावर अजित वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वीय्य सहाय्यक जितेंद्र देसाई यांना का वगळण्यात आले त्याना बदली धोरण नाही का ? त्यावर सीईओ म्हणाले की माझ्या पर्सनल बाबी गोपनीय माहिती त्यांचे कडे आहे नवीन कर्मच्यांऱ्यांना तेथे ठेवणे मला शक्य नाही असे स्पष्ट केले त्यावर वाघमारे म्हणाले अशामुळेच त्या कर्मच्याऱ्यांची मक्तेदारी निर्माण होते आणि तीच मक्तेदारी प्रशासनामध्ये चुकीची कामे करीत असतात . त्यानंतर सीईओ यांच्या कार्यालयात स्टेनोग्राफर पद असताना कांबळे यांना का डावलले जातेय त्यावर ते म्हटले त्यांचे रेकॉर्ड खराब आहे . त्यावर अजित वाघमारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला की मागासवर्गीय कर्मचारी यांना बदनाम व त्याचे रेकॉर्ड खराब करण्याचे काम हीच प्रस्थापीत मंडळी करत आहेत . लेखा विभागातील भोकरे व जाधव नामक कर्मच्याऱ्यांना गेली ६ वर्ष आश्वासीत प्रगती योजनेचा जाणीवपुर्वक लाभ दिला जात नाही गेली २० दिवस सदरची फाईल आपल्या टेबलवर सही विना पडून आहे . आपण मार्गदर्शन वरिष्ठाकडे मागताय असे कळाले असा प्रश्न वाघमारे यांनी उपस्थित केला असता सीईओ म्हणाले की मी मार्गदर्शन कोणत्याही केस मध्ये मागत नाही, सदरच्या फाईलचा निपटारा होईल अशी ग्वाही दिली.अनुसुचित जाती जमातीचा निधी दुसरीकडे वापरला जातो याचा ही खुलासा करण्यात आला आहे तसे या प्रकरणात कोणी जबाबदार असेल तर चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन सीईओ खिलारी यांनी दिलेले आहे.
मराठा युवकांवर झालेला अन्याय सहन करणार नाही
आज झालेल्या मीटिंग मध्ये सीईओ खिलारी यांना लक्षात आणून दिले की खुल्या प्रवर्गातील शिक्षण विभागातील अंदाजे चारशे रिक्त पदे आहेत व ती गेले पंधरा वर्षे भरलेली नाहीत त्यामुळे खुल्या प्रवर्गातील मराठा युवकांवर अन्याय होत आहे. जर या जागा त्वरित भरल्या नाहीत तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहे. तसेच एवढी वर्षे पदे रिक्त असताना भरली का नाहीत? या अन्यायाच्या विरोधात कोणीही आवाज का उठवला नाही? असे असंख्य प्रश्न घेऊन लढा उभा करणार व जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा चालूच राहणार तसेच आजच्या मीटिंग मध्ये सीईओ खिलारी यांनी वरील प्रकरणाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले व तसे जर झाले तर त्यांचे स्वागत चांगल्या प्रकारे करू-तुषार मोतलिंग (प्रदेश सदस्य बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र)