महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
धर्मादाय आयुक्तांनी महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्तालयातले काम व्हरच्युअल (व्हिडीओ काॅन्फरन्सिंग) पद्धतीने सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. कोरोनामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरीत परीणाम झाल्याने अनिर्णित प्रकरणे खूपच वाढली. पुणे विभागीय कार्यालयांतर्गत सोलापूर, सातारा, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो. खुद्द पुणे जिल्ह्याचा कार्यभार सांभाळण्यास एक उपायुक्त व तीन सहाय्यक आयुक्त आहेत. तसेच सार्व जिल्ह्यातील अपिलीय कामे तसेच संस्थांच्या जमीन विक्री, कर्ज प्रकरणांना मंजूरी, विश्वस्तांवरील दंडात्मक कारवाई यासाठी एक विभागीय सह आयुक्तांचे पद आहे. ही व्याप्ती मोठी असल्याने दररोज पक्षकार व वकिलांचा मोठा वावर असतो.
त्यामुळे कोविड प्रतिबंधक शासकीय नियमावलींचे काटेकोर पालन करणे अवघड होणार आहे. पक्षकार, वकील व अधिकाऱ्यांवर येणारा कामाचा मोठा ताण व्ही सी द्वारे सुनवणीमुळे खूपच कमी होणार आहे. पक्षकारांचा व वकिलांचा प्रवासाचा वेळ, श्रम व पैसा याची मोठी बचत होणार आहे व पूर्ण कार्यक्षमतेने कामकाज झाल्याने निर्णय प्रक्रिया जलद होणार आहे. तसेच कार्यालयात येण्याचे प्रमाण कमी झाल्याने कोविड प्रतिबंधक नियमावलीचे प्रभावीपणे पालन करता येईल.






















