स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीसाच्यावतीने चोख बंदोबस्त
नागठाणे /प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला सातारा जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला
होता
सातारा शहराबरोबर सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद मिळाला बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावात बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वतःस.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे व वर्षा डाळींबकर यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली
बोरगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही






















