वाई : रोटरी इंटरनॅशनल ,रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीस इन इंडिया तसेच रोटरी क्लब ऑफ वाई, आरोग्य विभाग, पंचायत समिती वाई, आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी भव्य ब्लड शुगर तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये एकाच दिवशी संपूर्ण भारतभर १० लाखाहून अधिक व्यक्तींचे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यात येणार आहे.
वन नेशन वन डे वन मिलियन असे या उपक्रमाचे नाव आहे. या अंतर्गत धोम, वेलांग,जांभळी, जोर, एकसर, बोरगाव, वयगाव, गोळेवाडी, बावधन, पसरणी, कवठे, पाचवड, वेळे, वाई शहर येथे स्पंदन हॉस्पिटल , गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाई ग्रामीण रुग्णालय ,वाई व श्री लॅबोरेटरी, निदान लॅबोरेटरी, चव्हाण लॅबोरेटरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी १२०० हून अधिक लोकांचे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यात येणार आहे.
ज्या व्यक्ती तीस वर्षाच्या पुढील आहेत
ज्यांना वारंवार घशाला कोरड पडते सारखे लघुशंका करायला जावे लागते चक्कर, अशक्तपणा जाणवतो. अशा सर्व व्यक्तींनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा.
हे शिबिर संपूर्ण भारतात एकाच दिवशी राबवले जाणार असून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड करण्याचा आमचा मानस आहे.
या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ वाई सोबतच आर्ट ऑफ लिव्हिंग संघटना वाई व आरोग्य विभाग पंचायत समिती वाई यांचं मोलाचं सहकार्य लाभणार आहे. असे रोटरी च्या वतीने सांगण्यात आले.
बुधवार दिनांक २९/०९/२०२१ रोजी होणाऱ्या मोफत ब्लड शुगर तपासणी शिबीर नियोजित ठिकाण व वेळ खालीलप्रमाणे-
धोम गाव – शाळा सकाळी ८.३० ते १०.० वाजेपर्यंत, वेलंग – प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सकाळी १०.०० ते १२.०० पर्यंत, जांभळी- शाळा दुपारी १.०० ते २.३०पर्यंत, जोर – शाळा दुपारी ३.०० ते ५.०० पर्यंत, एकसर गाव – शाळा सकाळी ८.३० ते १०.०० पर्यंत , बोरगाव – प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत, वयगाव – समाजमंदिर दुपारी १२.०० ते २.०० पर्यंत, गोळेवाडी- ज्ञानेश्वर मंदिर दुपारी २.३० ते ४.०० पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र बावधन, कवठे वेळे, पाचवड, पसरणी, वाई मधील लॅबोरेटरी श्री लॅबोरेटरी ( ब्राह्मण शाही ) चव्हाण लॅबोरेटरी ( ब्राह्मण शाही) निदान लॅबोरेटरी( धर्मपुरी पेठ) वाई ग्रामीण रुग्णालय, वाई. स्पंदन हॉस्पिटल( गजानन नगर,बावधन नाका) गीतांजली हॉस्पिटल(२४१० ब , सिद्धनाथ वाडी) येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० पर्यंत घेतले जाणार आहे.
रोटरी क्लब ऑफ वाई संपर्क क्रमांक
रो. दिपक बागडे (अध्यक्ष) ९९२३७८२२२९ रो डॉ प्रेरणा ढोबळे (सचिव) 9011283862 रो संजीवनी कद्दू (प्रकल्पप्रमुख) ९८५००६५६२६.