महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी –
भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार दिपक काकडे यांच्या पत्नी नुकत्याच कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराला लढा देऊन मरणाच्या दारातून माघारी आलेल्या व पुनर्जन्मच प्राप्त झालेल्या सौ.ज्योती दिपक काकडे यांनी आपला वाढदिवस हा सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचे ठरविले तशी इच्छा त्यांनी आपल्या पतीजवळ व्यक्त केली. ज्याप्रमाणे साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला जसा आपला वाढदिवस साजरा करतात त्या प्रेरणेने तसाच वाढदिवस साजरा करायचं ठरवून त्यांनी मालोजीराजे विद्यालय लोणंदच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा नेवसे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी सुचविलेल्या अमन शब्बीर पटवेकर या इयत्ता १० वी (सेमी) मध्ये प्रवेश केलेल्या, प्रतिकुल परिस्थितीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थित संपूर्ण शालेय साहित्य भेट देऊन त्यास शालेय दत्तक घेत आपला ५४ वा वाढदिवस खूपच प्रेरणादायी पध्दतीने साजरा केला.