पाटण ( प्रतिनिधी ) सोमवारी पाटण तालुक्यात नव्याने एकाला कोरोनाची लागन झाली . संबंधित रूग्ण हा दिवशी ( मारूल ) येथील असून तो एस. टी. कंडक्टर आहे. मुबंईहून परतल्यानंतर त्यांना तातडीने सातारा सिव्हिल हाॅस्पीटल येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले तेथेच त्यांचे चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांचेवर तेथेच उपचार सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यात नव्याने कोणी कोरोनामुक्तही झाले नाही त्यामुळे कोरोनाची एकूण बाधीत संख्या 66 झाली असून त्यापैकी 57 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. यात दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित सात रूग्नांवर उपचार सुरू आहेत. या पुर्वीच्या संबंधितांच्या संपर्कातील नऊ व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून सोमवारी बाधीत रूग्नांच्या संपर्कातील एक व पाटण ग्रामीण रूग्णालयातील दोन कर्मचारी अशा तिघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
तालुक्यात आत्तापर्यंत 25 गावातील एकूण 66 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी तब्बल 57 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यानच्या काळात यापैकी दोन वृद्ध महिलांचा यात मृत्यू झाला. उर्वरित जांभेकरवाडी, भालेकरवाडी, काळेवाडी ( आडूळ ), उरूल, शिरळ, धामणी येथील प्रत्येकी एक अशा एकूण सहा व्यक्तींवर कृष्णा हाॅस्पीटल कराड तर रविवारी रात्री दिवशी ( मारूल ) येथील पाॅझिटीव्ह रूग्नावर सिव्हिल हाॅस्पीटल सातारा येथे उपचार सुरू आहेत. या रूग्नांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक अशा तिन व्यक्तींना पाटण येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृहात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सोमवारी यापैकी एकाचा व ग्रामीण रूग्नालय पाटण येथील दोन अशा एकूण तिघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जांभेकरवाडी येथील एका कोरोनामुक्त महिलेची होम क्वारंटाइन सुविधा उपलब्ध नसल्याने तिच्यासह तीची लहान मुलगी अशा दोघींना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते त्यांची सात दिवसांची मुदत संपल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी कोरोनामुक्त झालेले दिवशी ( मारूल ) हे गाव पुन्हा कोरोना यादीत आले आहे. तथापी येथील संबंधित कोरोना बाधीत एस. टी. कंडक्टर हे मुबंईवरून परतल्यानंतर त्यांना तेथून सातारा सिव्हिल हाॅस्पीटलला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी तेथेच दाखल करण्यात आले आहे