बारामती प्रतिनिधी
दिनांक १५ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यातील ५० प्राथमिक शिक्षकांची कोविड उपचार केंद्रावर व विलगीकरंण केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेस मदत करण्याकरिता नियुक्ती केली होती.रोटेशन पद्धतीने शिक्षकांंना नियुक्त करावे. दिनांक १७ जुलै रोजीच्या पत्रान्वये सामान्य प्रशासन विभागाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेशीत करण्यात आले आहे. त्या आदेशा नुसार दिनांक १५ जुलै रोजी नियुक्त केलेल्या समंधित शिक्षकांनी १५ दिवसांपेक्षा जास्त काळ कामकाज केले असल्याने त्यांना या कामा मधुन कार्यमुक्त करण्यात यावे. अशी मागणी कै. शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
कोविड उपचार केंद्र येथे नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांंना २४ तास ड्युटी न देता सकाळी ८ ते सायंकाळी ८ अशी १२ तासांची ड्युटी ६ तासांच्या दोन टप्प्या मध्ये देण्यात यावी.तसेच समंधित नियुक्त कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना संपूर्ण मेडिकल किट,मास्क,सानिटायझर,हॅन्डग्लोज इत्यादी साहित्य उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे त्यांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात यावे.अशी मागणी केशवराव जाधव यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.
बारामती तालुक्यामधील प्राथमिक शिक्षकांना कोविड उपचार केंद्र रुई व मेडिकल कॉलेज बारामती विलगीकरण केंद्र येथील कामातून कार्यमुक्त करण्यात यावे.या संदर्भात बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाने बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल काळभोर व गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांना निवेदन दिले.यावेळी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड,अध्यक्ष हनुमंत शिंदे,सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड,संपर्कप्रमुख रेवणनाथ परकाळे,सल्लागार उत्तम जगताप,बाळासाहेब नरुटे,अविनाश भोसले,शरद भोई,त्रिंबक ताम्हाणे,बापू खरात उपस्थित होते.