महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (सातारा ) : राहुल ताटे-पाटील
भारत -चीन सीमेवर गलवान खोऱ्यात चीनकडून हिंसक झडप घालण्यात आली. यात भारताचे २० जवान शहीद झाले.
सातारा तालुक्यामधील अंगापूर वंदन गावामध्ये आजी माजी सैनिक संघटना यांच्यावतीने अंगापूर बाजार पटांगण येथे चकमकीत शहीद झालेल्या जवानाना श्रद्धांजली व चीनी वस्तूंवर बहिष्कार तसेच चीनच्या प्रतीकात्मक वस्तू व ध्वज यांचे दहन करण्यात आले त्यानंतर आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी इथून पुढे कोणीही चीनला प्रोत्साहन होणाऱ्या किंवा आर्थिक बळकटी देणाऱ्या गोष्टी विकत घेणार नाही याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.