कराड विजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते दिवस भरात लाखो वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात विजापूर ला जात असताना सुर्ली घाटरस्ता लागतो सुर्ली घाटाच्या पुढे विट्या पर्यंत रस्त्याचे काम झाले आहे घाटाच्या खाली कराड पर्यंत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे परंतू सुर्ली घाटात अद्यापही कामास सुरुवात झाली नाही राष्ट्रीय महामार्गाचे शासकीय अधिकाऱ्यांना काम का चालू झाले नाही असे विचारले असता वनविभागाने रस्ता करण्यास परवानगी देत नाही असे सांगतायत वनविभागाने रस्ता अडवलाय असे सांगतायत वनविभाग जर आडमुठी भुमिका घेत असेल तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्तपणे मिटिंग घेऊन सुर्ली घाटातील रस्त्याबाबत सकारात्मक तोडगा काढावा सर्व सामान्य प्रवाशांच्या जिवाशी प्रशासनाने खेळू नये
या रस्त्याच्या ठेकेदाराने डांबरीकरण असलेल्या रस्त्यावरवरचे खड्डे डांबर वापरूनच मुजवावे इतर सिममेंटचे मटेरियल वापरले तर खड्डे वारंवार पडणार तात्काळ सुर्ली घाटातील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबर वापरूनच मुजवण्यास राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी यांना सांगून सर्वांची एकत्रीत बैठक घेऊन सुर्ली घाटातील बंद असलेले काम तात्काळ चालू करावे अन्यथा सर्वांना बरोबर घेऊन सुर्ली घाटात रास्तारोको करणार होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार असल्याचे साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे