महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सातारा दि. 21 : एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( हिंगणगाव ) येथील 61 व 32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष. माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील म्हातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील राजापूरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला.