महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(फलटण)
फलटण तालुक्यात कोविड -19 बाधित महिलेच्या निकट संपर्कातील तीन व्यक्तींची कोविड चाचणी होकारात्मक आली आहे
मुंबई परिसरातून शेरेचीवाडी (हिंगणगाव) येथील 38 वर्षीय महिलेची 13 जून रोजी करण्यात आलेली चाचणी होकारात्मक आली होती. त्या महिलेच्या निकट संपर्कातील आणखी तीन व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.
त्यामध्ये दोन पुरुष वय 61 आणि 32 वर्षे, एक महिला ,वय 27 यांचा समावेश असून सदरच्या तिन्ही व्यक्ती मुंबई परिसरातून आलेले आहेत.तसेच मंगळवार पेठ फलटण येथील पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या व्यक्तीच्या निकटवर्तीय संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिलेली आहे




















