महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
गेल्या अकरा दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार घेत असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना 22 जुन रोजी दुपारी दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे . धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यावर परळी आणि बीड मधील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून आज ते आपल्या घरी परततील. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.