सातारा : ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार अर्ज करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून ,३० डिसेंबर (दुपारी ३ पर्यत ) ही शेवटची मुदत आहे. मात्र, २५ ते २७ या काळात सार्वजनिक सुट्ट्या असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवसच मिळणार आहेत . ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे . त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत २५ हजारांची मर्यादा ठरवून दिली आह तर ११ ते १३ उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीतील प्रत्येक सदस्याला निवडणूक कालावधीत ३५ हजारांचा खर्च करता येईल . १५ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना ५० हजारांपर्यत खर्च करता येणार आहे तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील (एससी) उमेदवारास प्रत्येकी शंभर रुपयांचे डिपॉझिट द्यावे लागणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेवारासाठी पाचशे रुपयांची अनंत रक्कम भरावी लागणार आहे .
निवडीसंबंधीचे निकष व नियम …
जात प्रमाणपत्रांचीपडताळणी करून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून झाली ऑनलाइन एक खिडकी योजनेतून घ्यावा लागणार अर्ज तहसील कार्यालयाकडून घ्यावा. जात पडताळणीसाठी दिलेली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत .
उमेदवाराने ऑनलाइन जात पडताळणी प्रस्तावाची प्रत,ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह पडताळणी कार्यालयास द्यावीत जात पडताळणी कार्यालयास द्यावीत. जात पडताळणीच्या प्रस्तावाची पोचपावती , ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर १२ महिन्यांत द्यावे लागणार.
एक व्यक्ती तथा उमेदवार एका प्रभागातून एकच अर्ज करू शकेल ; एका प्रभागातून अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येईल
एका प्रभागातून भरलेल्या अर्जातून एक अर्ज वैध धरला जाईल;एक जरी अर्ज उमेदवाराने मागे ग घेतला तर त्या प्रभागातून संबंधितांचे माघार घेतली असे समजले जाईल. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर उमेदवाराने हमीपत्र व घोषणापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावे
निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करीत असल्याचे हमीपत्र ,अपत्यांबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र ,अनामत रकमेची पावतीही बंधनकारकग्रामपंचायतीचा थकबाकीदार , व ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र ,नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व बँक पासबुक (राष्ट्रीयकृत तथा शेड्युल बँक )द्यावे.
एका प्रभागात एक चिन्ह वाटप झाल्यानंतर तेच चिन्ह त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही ;१९० मुक्त चिन्हांपैकी एक उमेदवार पाच चिन्ह निवडू शकतो






















