मुख्य समस्यांना बगल देत केंद्राचे भावणीकतेचे राजकारण – पालकमंत्री बाळासाहेब पाटील.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : बेलवडे हवेली ता.कराड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न.देशात सद्या महागाई गगनाला भिडलेली आहे, पेट्रोल, डिझेल, गॅस यांसह जीवनावश्यक वस्तूच्या किमतीतही झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जेनेतेचे बजेट कोलमडले आहे, याकडे लक्ष न देता केंद्र सरकार नवनवीन मुद्दे इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर मांडून लोकांचे लक्ष विचलित करून भावनीकतेचे राजकारण करत आहे, असे मत राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
ते बेलवडे हवेली ता.कराड येथे त्यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई) यांची प्रमुख उपस्थितीती होती.
नामदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, विकास ही न थांबणारी संकल्पना असुन, ग्रामस्थांनी विकासात्मक केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. गावच्या विकासासाठी एकजुटीने काम करून गावचा नावलौकिक वाढवावा.
यावेळी लेखाशीर्षक(२२१० – ३०६५) ३१ सहाय्यक अनुदान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करणे, २५१५ इतर ग्रामीण विकास योजना सन २०२१-२२ मधून गाव अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे तसेच आर सी सी गटर बांधकाम करणे, कोयना भूकंप विकास निधी सन २०२१-२२ अंतर्गत गणेश जाधव यांच्या घर ते दत्तात्रय सुतार यांच्या घरापर्यंत आर सी सी गटर बांधकाम करणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ मधून प्राथमिक शाळा खोली बांधकाम करणे (३खोली), जलजीवन मिशन योजना सन २०२१ -२२ मधून नळपाणीपुरवठा योजना विस्तारीकरण करणे व बेलवडे हवेली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी नूतन इमारत बांधकाम करणे या कामांचे भूमिपूजन तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शेष फंडातून मंजूर झालेल्या गावअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे यांच्या विशेष प्रयत्नाने पंचायत समिती शेष फंडातून वॉटर ए. टी. एम.बसवणे आणि हाय मास्ट लॅम्प बसवणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराजदादा पाटील व सौ.संगीता साळुंखे(माई), प्रणव ताटे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब पवार यांनी केले व आभार पोपट पवार यांनी मानले.
याप्रसंगी सौ.शारदा पाटील, लालासाहेब पाटील, डी.बी.जाधव, पै.संजय थोरात, माणिकराव पाटील, जयवंत थोरात, पांडुरंग चव्हाण, रामदास पवार, रामचंद्र पाटील, ॲड.सी.बी.कदम, ॲड.दादासाहेब जाधव, राजेश पाटील-वाठारकर, उध्दवराव फाळके, कुलदीप पवार, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील(दादा), संभाजीराव पिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपनिबंधक कराड संदीप जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गीरिष सावंत,वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा निकम, भास्करराव गोरे, सोमनाथ जाधव, चंद्रकांत कदम, युवराज जाधव, दादासाहेब जाधव, धनाजीराव जाधव, जयवंतराव मोहिते, गोविंदराव थोरात, सिध्दांत सिरसाट, राजेंद्र जाधव, संजय पिसाळ, अनिल जगदाळे, मानसिंग जगदाळे, जालिंदर खोचरे, बजरंग पवार, सरपंच श्रीकांत पवार, उपसरपंच शिवाजी जाधव, चेअरमन विजयराव पाटील, व्हा.चेअरमन गंगाधर बोधे, भार्गव पवार, प्रदीप पवार, पिराजी पवार, सूर्यकांत पाटील, आनंदराव पवार, विक्रमसिंह पवार, अक्षय जाधव, सौ.शारदा पवार, रमेश पाटील, जयवंत थोरात, सुभाष पवार, निलेश पवार , ACP नाईक बापूसो कुंभार, सुनील रघुनाथ पवार, सुनील गुरव, आप्पासो पवार, सुनील श्रीरंग पवार, धनाजी पवार, योगेश पवार, सचिन ताटे, दादासो पवार, रतन पवार ग्रामपंचायतीचे आजी – माजी सदस्य, सोसायटीचे आजी माजी संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.