महाराष्ट्र न्यूज:-
इंदापुर प्रतिनिधी
राज्यसेवा परीक्षा २०१९ च्या परीक्षेतून नायब तहसीलदार पदी निवड झालेले चि. अमोल महादेव नरुटे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (एमबीबीएस) साठी प्रवेश मिळालेले चि. सागर अण्णा नायकुडे या दोन्ही सूपुत्रांचा सन्मान पिंपरी खुर्द व सुगांव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. दोन्ही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या घराण्याचा आणि आई वडिलांचा नावलौकिक वाढवला. भविष्यात विद्यार्थ्यांना अशीच स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी आणि उत्तरोत्तर स्पर्धा परीक्षेतून गावातील इतरही विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या प्रशासनात काम करण्याची संधी मिळावी असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.