फलटण : जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पात्र ठरविले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या कच्चा मतदार यादीत माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे पाणी पुरवठा मतदारसंघातील ठराव जिल्ह बँकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावरून या दोघांनी विभागीय सहनिबंधकांकडे हरकत दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन विभागीय सहनिबंधकांनी या दोघांचेही ठराव पात्र ठरविले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना चपराक बसली आहे.