पंचायत समितीच्या चला माणूस वाचवूया…उपक्रमाचे यश.. शिक्षकांचा मोठा वाटा.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड पंचायत समितीच्या पुढाकाराने कोविड१९ नावाने पार्ले येथे सेंटर सुरु करण्यात आले. आजवर या सेंटरमध्ये २०३१ रुग्ण दाखल झाले होते. तर केंद्रातून ९६६ रुग्ण पूर्ण बरे होवून घरी सोडण्यात आले. याशिवाय ९६० रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५१३ असे एकूण १४७९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
या सद्या या ठिकाणी १४९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर १३३ रुग्ण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. या सेंटर साठी सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येत आहेत. २० ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले असून रेमडीसिवर सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून कराड तालुक्यातील शिक्षक प्रयत्न करत आहेत.

आज या सेंटर मधून ६ रुग्णांना निरोप देण्यात आला. यावेळी कराड पंचायत समितीचे सभापती- प्रणव ताटे, उपसभापती- रमेश देशमुख,
विस्तार अधिकारी- नितीन जगताप, आनंद पळसे. शिक्षक संघटना अध्यक्ष- प्रदीप रवलेकर, गणेश जाधव, जहांगीर पटेल यांची उपस्थिती होती.
































