फलटण : नांदल, ता. फलटण येथील सर्वसामान्य कुटुंबामधील जन्मलेल्या कु. ज्योती हिंदुराव कांबळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन करून (रेंज फॉरेस्ट ऑफिसर) वर्ग-२ पदाकरिता पात्र झाल्या आहेत.
ज्योती कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथ. शाळा, नांदल येथे झाले. श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, नांदल येथे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेती महाविद्यालय, फलटण येथे १२ वी पूर्ण केली. शिवाजीनगर (पुणे) येथे त्यांनी बी.एस.सी (ऍग्री) चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केल्याने त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांमधून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






















