*प्रशासनाचे आवाहन*
प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात विशेष सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात विषाणूंचा प्रादुर्भाव विशेष करून वाढताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे सातत्याने मास्क वापरणे सामाजिक अंतर पाळणे अजिबात गर्दी न करणे वारंवार हात स्वच्छ धुणे या गोष्टी नागरिकांनीच काटेकोरपणे पाळाव्या तसेच काहीही कारण नसताना घराबाहेर अजिबात पडू नये गर्दी करु नये असे देखील पुढे पत्रकात म्हटले आहे शासनाने आणि प्रशासनाने वारंवार सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत त्या काटेकोरपणे पाळाव्या आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपाय घरगुती पद्धतीने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत बाधित झालेल्या व्यक्तींना तसेच हाय रिस्क असलेल्या व्यक्तींना सहकार्य करावे गाव पातळीवर सामंजस्याने सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे तज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार गोल्डन मिल्क गोल्डन वॉटर यांचा हळद टाकून वापर तसेच घरगुती उपायांमध्ये खोबरेल तेल तिळाचे तेल मोहरीचे तेल आदींचा वापर करून स्वतः कुटुंबाची काळजी घ्यावी नियमित योगासने व्यायाम गरजेचा आहे.
त्यामुळे आपला समाज सुरक्षित राहील लहान मुले दिव्यांग तसेच गरोदर स्त्रिया वृद्ध व्यक्ती त्यांची विशेष काळजी घ्यावी साखळी तोडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे परंतु जनतेची साथ मिळणे गरजेचे आहे विशेषतः सध्याच्या परिस्थितीत सर्व सुशिक्षित नागरिकांनी स्वतः इतरांनाही नियम समजावून सांगावेत असे कळकळीचे आवाहन पत्रकात करण्यात आल आहे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली शासन काटेकोर प्रयत्न करत आहे असे देखील आवर्जून नमूद करण्यात आले आहे.