कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे . इंदापूर शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ७२ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील कोरोनामुळे बळी पडलेल्या रूग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे.
इंदापूर शहरातील महतीनगर येथे वास्तव्यास असलेल्या ७२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती . या रुग्णावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते , या रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . रूग्ण मृत्यू पावल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या रूग्णाच्या मृत्यूनंतर तालुक्यातील बळींची संख्या तीनवर गेली आहे . त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली आहे . दुसरीकडे प्रशासनाकडून याबाबत अधिकाधिक दक्षता घेतली जात असतानाच एका वृध्द रूग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.