सुनील निंबाळकर बारामती प्रतिनिधी...
आयोध्या येथे नियोजित श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे, हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून यामध्ये आपलाही सहभाग असावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आयोध्येत सुरू असणार्या श्रीराम मंदिर उभारणीसाठी मोरया गोसावी यांच्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत २१ लाख रुपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला.देणगी स्वीकारताना स्वामी म्हणाले देवस्थान मार्फत मिळालेली ही देणगी म्हणजे श्रीगणेशाचा प्रसाद असून मंदिर उभारणीसाठी मोरयाचा हा कृपा आशीर्वादच आहे.
त्याला अनुसरूनच मंदिर उभारणीसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट चिंचवड ,पुणे यांच्या अधिपत्याखाली मोरगाव, थेऊर, सिद्धटेक व चिंचवड यांच्या वतीने २१ लाख रुपयांचा धनादेश श्रीराम मंदिराचे मुख्य विश्वस्त स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला शनिवार ०६ फेब्रुवारी रोजी धनादेश देताना चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार उपस्थित होते. अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपये तर इतर विकास कामांसाठी अंदाजे ११०० कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.मुख्य मंदिराचे काम तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण होईल.मंदिर उभारणी आर्थिक मदत देण्यासंदर्भात चिंचवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ यांनी २१ लाख रुपये देण्याचे सर्वानुमते ठरवले होते त्याप्रमाणे २१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असे विश्वस्त विनोद पवार यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले.
Like this:
Like Loading...
Related