श्री मळाई देवी शिक्षण संस्था,मलकापूर संचलित आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये महामार्ग पोलीस मदत केंद्र कराड यांच्यावतीने मृत्युंजय दूत अभियानास विविध उपक्रमांनी प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी केले,त्या म्हणाल्या की मानवी चुकांमुळे अपघात घडत असले तरी योग्य व वेळेत उपचार मिळावेत यासाठी हायवे मृत्युंजय दूत अभियान राज्यातील महामार्ग पोलिसांच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तसेच मृत्युंजय दूत पथके हा कार्यक्रम झाला व त्यांनी माहिती दिली. हायवे मृत्युंजय दूत पथके अपघातग्रस्तांना मदत करणार. राज्यमहार्मार्गावर राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मॉल ,पेट्रोल पंप,ढाबा, हॉटेलमधील कर्मचारी व जवळच्या गावातील नागरीकांच्या ग्रुपमधून हायवे मुत्युंजय दूत पथके तयार केली जाणार आहेत. खाजगी,सरकारी, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने त्यांना प्रथमोपचाराची व अपघातग्रस्तांना कसे हातळायचे यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
स्ट्रेचर आणि प्राथमिक उपचाराच्या साहित्यासह हायवेवरील सर्व हाँस्पिटलचे संपर्क क्रमांक खाजगी व सरकारी रुग्णवाहिका १०८ रूग्णवाहिका याबाबतची सर्व माहिती या दुताकडे असणार आहे.
याप्रसंगी शेती मित्र अशोकराव थोरात म्हणाले पोलीस खात्याचा मृत्युंजय दूत हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास मृत्यू दरही कमी होवून यातून अनेकांना जीवनदान मिळेल
कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळेत मदत कशी करायची याची माहिती दिली व प्रात्यक्षिकही करून दाखविले. तसेच अपघातग्रस्तांना मदत करणेसाठी सदैव तत्पर असणारे दस्तगीर रमजान आगा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मलकापूरचे पोलीस पाटील प्रशांत गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले,उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शेखर शिर्के यांनी मानले.
प्रबोधनपर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, प्राचार्य एस.वाय.गाडे,पर्यवेक्षक अनिल शिर्के, जगन्नाथ कराळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
































