महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामती शहरात करोना रुग्णांच्या संपर्कातील तीन ३ व्यक्तींना करोनाची बाधा झाली असल्याचे आलेल्या तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. बारामती मधील करोना रुग्णांची संख्या एकूण 60 वर पोहोचली आहे. काल दि (१२) रोजी शहरात सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ६८ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ४६ जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.
बारामती शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. बारामती शहरात दि ( 12 ) रोजी १८ जणांना करोना झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कातील 68 व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातील तिघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. बारामती शहरात करोनाचा वाढता धोका लक्षात घेता आज सोमवार दि १३ पासून बाजारपेठेतील दुकानांच्या वेळेत सकाळी ९ ते ३ असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन योग्यरीतीने करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.























