महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / माण :
माण-खटाव तालुक्यातील जनावरांच्या चारा छावण्यातील भ्रष्टाचार, अधिकार्यांची टक्केवारी प्रकरण, अवैध वाळू तसेच या प्रकरणी पकडलेला ट्रक सोडला आणी आणला या अशा अनेक प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करत संजय भोसले यांनी आंदोलनेदेखील केली मात्र जिल्हाधिकारी यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळेच घोटाळे करणाऱ्यांना जिल्हाधिकार्यांचा अभय आहे का? अशी जनतेतून कुजबूज चालू असलेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट करताना संशय व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी यांचाकडे सदर प्रकरणांच्या तक्रारी दाखल झालेपासून एकून हालचालींचा मागोवा घेतला असता भोसले यांनी देखील संशय येण्यासारख्या अनेक घटना घडत गेल्या आहेत, कारण प्रत्येक तक्रारीवेळी चौकशी समिती नेमलेस भोसले यांनी पुरावे सादर करणेस तयार असलेचे कळवून देखील आजअखेर एकादेखील तक्रारीच्या अनुशंगाने चौकशीस बोलविणे तर बाजूलाच राहिले, भोसले यांना एका अक्षराने कळविण्याची साधी तसदी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नसलेचे देखील भोसले यांनी पत्राद्वारे सांगीतले आहे.
” सब घोडे बारा टक्के ” या प्रकारामध्ये तहसिल विभाग, उपविभागीय कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ते कर्मचारी यांची वर्तूणूक असलेचा सणसणीत आरोप संजय भोसले यांनी केला असून या प्रकारांची शहानिशा केल्या खेरीज भोसले स्वत: शांत बसणार नसल्याचे सांगतानाच या तक्रारीमध्ये अर्थपूर्णव्यवहारांचा अधिकारी,सरकारी कर्मचारी,राजकीय नेते, सामाजिक संस्थांचे मालक यांचा भांडाफोड होणार असल्यानेच भोसलेच्यावर अनेक प्रकारचे हल्ले होऊ शकत असल्याचा व तसे प्रकार सुरु असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र अशा प्रकारांना भिक घालत नसलेचे सरतेशेवटी भोसले यांनी सांगितले आहे.






























