हेळवाक आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान
पाटण प्रतिनिधी: पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाक येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियान गुरूवार दि नऊ जुन रोजी वैद्यकीय अधिकारी इंदिरा भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामधे गरोदर मातांना गुणवत्ता पुर्वक प्रसुती पुर्व सेवेसाठी कार्यक्षेत्रातील गरोदर माता बालकांची शंभर टक्के तपासणी करून मातामृत्यु दर कमी करणे हा मुख्य उद्देश असुन हेळवाक आरोग्य केंद्रामधे आयोजित केलेल्या अभियानात कार्यक्षेत्रातील गरोदर माता वजन कमी असलेल्या बालकांची रक्त ,लघवी, मधुमेह, रक्तदाब आदी तपासण्या करण्यात आल्या तदनंतर कृष्णा हाॅस्पिटल कराडच्या स्त्रीरोग तज्ञांनी उपस्थित गरोदर मातांची तपासणी केली गटप्रवर्तक मनिषा खांडेकर यांनी सकस आहार, प्रसुती पुर्व व पश्चात घ्यावयाची काळजी तसेच संतती नियमनांविषयी मार्गदर्शन केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी गणेश अवसरे,ज्ञानेश्वर सुर्यवंशी, हर्षदा धरणे,प्रियांका गवळी आरोग्य सहाय्यक पावरा, आरोग्य कर्मचारी पार्वती माने धनश्री चवरे जमीर नदाफ गटप्रवर्तक मनिषा खांडेकर जे के देशमुख आशासेविका अल्मास शेख अल्मास पटेल सुनिता कुंभार,अश्विनी कदम मेघना शेलार आशा रोकडे अंगणवाडी सेविका दिपाली कारंडे संध्या शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.
गरोदर माता बालकांना ने आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय केली होती. तसेच उपस्थितांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत एक दिवस मातेसाठी ही संकल्पनेनुसार प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रात अभियान राबविण्यात येणार असुन सर्व माता बालकांनी या अभियानात सहभागी व्हावे
इंदिरा भिंगारदिवे वैद्यकीय अधिकारी