महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले : कळंब – इंदापूर
इंदापूर तालुक्यातील सणसर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लाॅकडाऊन काळात वाढीव आलेल्या वीज बिलांची संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली होळी करण्यात आली .
लाॅकडाऊनच्या काळात घरगुती , शेती व छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना वाढीव वीजेचे बील आले असल्याने या बिलांची होळी करण्यात आली आहे . यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रय झेलकर , उध्दव फडतरे , सुखदेव जाधव , गणपत कदम , अमोल भोईटे , नितीन कदम , अमोल चव्हाण , विनायक कदम , मनोज पवार , नितीन सपकळ यांनी वाढीव आलेले वीज बिल महावितरण कंपनीने कमी करून द्यावे , अशी मागणी केली आहे .