सातारा प्रतीनीधी –
मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातलेल्या कोयनानगर हुरबळी गावांमध्ये मोठ्या प्रामाणात नुसकान झाले आहे. अध्यक्ष वनिता मोरे व प्रा. दिपक तडाके महेश यादव.ऋषिकेश महाडिक या सर्वांच्या मार्फत दुर्वा महिला उद्योग समुहाने मदतीचा हात पुढे केला आहे. एक हात कर्तव्याचा या उपक्रमाव्दरे दूर्वा महिला उद्योग समूह यांचा मार्फत हुरबळी गावांमध्ये महिलांसाठी कपडे व घर उपयोगी वस्तूचे वाटप केले आहे.
साड्या. गाऊन. महिलांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू व घरगुती धान्य, बिसलेरी, पाण्याची बॉटल, लहान मुलांसाठी खाऊ अशा घर व उपयोगी वस्तू वाटप दुर्वा महीला उद्योग समूहाच्या मार्फत हुरबळी अत्यंत अडचणीत असलेल्या गावांमध्ये जाऊन सर्व गावकऱ्यांना एकत्रित करून या वस्तूचे वाटप करण्यात आले.गावकऱ्यांनी दुर्वा महीला उद्योग समूहाचे अध्यक्ष वनीता मोरे, प्रा. दीपक तडाके ,महेश यादव. बी जी एम ग्रुप आगाशिवनगर ऋषिकेश महाडिक. या सर्वांच्या मदतीने या मोलाचे कार्य पार पाडण्यास सहकार्य लाभले. हुरबळी गावकऱ्यानी या सर्वांचे मनापासून आभार मानले.