दहिवडी : दहिवडी फलटण रस्त्यावर असणाऱ्या शितल ढाब्यासमोर शनिवारी सकाळी दुधाच्या टँकर अन लुना नावाच्या दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात लक्ष्मण गेना शिंगाडे वय-६२वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे
पचावड येथील लक्ष्मण गेना शिंगाडे वय-६२ वर्ष हे त्यांच्या घरून गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर जात असताना फलटण कडून येणारा एम एच.४२.टी.२२६३ या दुधाच्या टँकरने लुना गाडीला समोरून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला या अपघाताची फिर्याद बाळू तुकाराम शिंगाडे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली असून सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एन. एस.खाडे अधिक तपास करत आहेत















" width="90" height="60">
" width="180" height="120">




