महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :महाबळेश्वर
महाबळेश्वर पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नाकिंदा या गावात राहत्या घराच्या बाजूच्याच भितीवरून बिबट्या जात असल्याचे सी सीटिव्हीत कैद झाल्या मुळे गाव परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
महाबळेश्वर येथील केटस पाॅईट च्या शेजारी नाकिंदा हे गाव वसलेले गावांच्या चारही बाजूने घनदाट जंगल असल्यामुळे या परिसरात अनेक वन्य प्राण्याचे दर्शन होते परंतु हा बिबट्या मानवी वस्ती दाखल झाल्याची पहिलीच घटना आहे
नाकिदा गावामध्ये राहणाऱ्या दादू भाई पटेल याच्या घराच्या परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान सी सी टिव्ही कॅमेऱ्या मध्ये घराच्या बाजूच्याच भिंतीवरून जात असताना तर दुसऱ्या कॅमेरात घराच्या समोरील कॅमेरात त्याचे चित्रीकरण कैद झाले बिबट्या मानवी वस्ती दिसण्याची ही पहिलीच घटना आहे या मुळे नाकिदा या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढत असल्यामुळे वनविभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकामधून व्यक्त होत आहे





















