महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब-इंदापूर)
मोठ्या व धनदांडग्या कुटुंबाना कितीही मदत केली , तरी एखादे काम करायचे राहीले तर मागील सगळे विसरले जाते . परंतु उपेक्षित मजूर , कामगार , कलाकारांना केलीली मदत कायम आठवणीत राहते .ती कधीच विसरली जात नाही . हि अशीच मदत इंदापूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने तालुकाभर मिळते आहे .
यामुळे लाॅकडाऊनच्या काळात कलाकारांना मोठा आधार मिळाला आहे , त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे काम आदर्शदायी असल्याचे गौरवोद्गार सोलापूर जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम आणि पशुसंवर्धन व दूग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
इंदापूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने शेटफळ येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त २५० विविध क्षेत्रातील कलेच्या कलाकारांना मोफत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर , हनुमंतराव कोकाटे , सागर मिसाळ , पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मोहिते , संदिप सुतार , आबासाहेब उगलमोगले , शिवकुमार गुणवरे , राजेंद्र भोसले , गोकुळ टंगसागळे आदी उपस्थित होते .