महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :लोणी भापकर
लोणी भापकर येथे साहित्य सम्राट, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.कोरोना च्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेले नियम व अटींचे पालन करत लोणीभापकर येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे तरुण मंडळ यांच्या वतीने गर्दी न करता लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, सरपंच रवींद्र भापकर, उपसरपंच पदमनाथ कडाळे,राहुल सकाटे,विकास सकाटे, नवनाथ सकाटे, किशोर सकाटे, रोहन गायकवाड, चेतन मोरे, व समाज बांधव उपस्थित होते.