महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामती शहरातील आमराई येथील ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, बारामती तालुक्यातील कोरोना बळींची संख्या आज सहावर गेली आहे.
बारामती शहरातील आमराई येथील एका महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी या महिलेला बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून हे रुग्णालय शासनाने ताब्यात घेतले असून आज सकाळी या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.