महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी :
रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच विविध उपक्रम राबवित असते फलटण तालुक्याच्या सर्व महत्वाच्या गावांमध्ये बाजार समिती मार्फत “कृषी देव” या नावाने पेट्रोल व डिझेल पंप सुरु करीत आहे. ढवळपाटी, वाखरी येथे हिंदुस्थान पेट्रोलियम व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सयुंक्त विद्यमातून पेट्रोल पंप सुरु होत आहे. ह्या व अश्या अनेक उपक्रमामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती नक्कीच संपूर्ण राज्यात अनोखा नावलौकिक कमावेल अशी खात्री आहे, असे मत फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी “कृषी देव” या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सह्यायक निबंधक धायगुडे बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, सौ. दिपाली निंबाळकर, कृष्णाथ (दादासाहेब) चोरमले, अमरसिंह खानविलकर, अनिल शिरतोडे, बाजार समिती संचालक विनायक पाटील, प्रकाश भोंगळे, मोहन निंबाळकर, परशुराम फरांदे, बाळकृष्ण रणवरे, चांगदेव खरात, समर जाधव, रामदास कदम, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, शिवाजीराव लंगुटे, रामचंद्र नाईक निंबाळकर, शरद रणवरे, यश कन्स्ट्रक्शनचे राजीव नाईक निंबाळकर, बापू पाटील, गोविंद भोंगळे, ईश्वर जाधव, दिलीप पवार, महेश ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे १२ पेट्रोल पंप मंजूर असून आगामी काळात तालुक्यातील शेतकऱ्याला इतर कोणत्याही व्यापाऱ्याच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरायची गरज नाही. आगामी काही काळात फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वच्या सर्व पेट्रोल पंप लवकरच सुरु होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी आमचे नेते व बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कल्पनेतून विविध शाश्वत पर्याय शोधलेले आहेत. त्या बद्दल श्रीमंत रघुनाथराजे यांच्यासोबतच बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिव शंकरराव सोनवलकर आणि सर्व बाजार समितीचा स्टाफ यांनी केलेल्या पाठपुराव्याचे त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे असेही आमदार दिपकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.
फलटण – कोरेगाव रस्त्यावर फलटणकडून पुसेगाव फाटा ते ताथवडा घाट पर्यंत कोणताही पेट्रोल पंप नाही. पुसेगाव फाटा व त्या भागासह वाखरी, ढवळपाटी यांच्या सह इतर २२ गावांना बाजार समितीच्या “कृषी देव” या पेट्रोल पंपाचा फायदा होणार आहे. सकाळ उद्योग समूहाच्या अग्रोवन मार्टच्या माध्यमातून मार्केट यार्ड, फलटण तसेच सबयार्ड वाखरी (ढवळपाटी) येथे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व गरजा खते, बियाणे औषधे, पशुवैद्यकीय सल्ला तसेच इतर सर्व बाबी शेतकऱ्यांच्या थेट बांधापर्यंत पोहोचवणेत येणार आहेत, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.